बलात्कार : पुरुषसत्ताक हिंसेचा आविष्कार!
आपल्याकडे आपल्या धर्मव्यवस्थेने, समाजव्यवस्थेने आपले जे पुरुषसत्ताक वर्चस्वाचे मानस घडवलेले आहे, ते मानस ‘स्त्री’ला एक ‘माणूस’ म्हणून संबोधणारे नाही. ते मानस ‘स्त्री’ला एक ‘वस्तू’ मानणारे आहे. त्यामुळे तिला/स्त्रीला काही मन असते, भावभावना असतात, विचार असतो, संवेदना असतात. हे ते समजूनच घेत नाही. त्यातूनच स्त्रीसंबंधीच्या अंगाने पुरुषी मानसिकतेत एक हिंस्त्र जाणीव मूळ धरून असते.......